फुकट नाही पटत....!
एक मोठ्या कंपनीचा मालक फार भाविक असतो. तो आपल्या कंपनीच्या बाहेर कंपनी मार्फत विनामुल्य पिण्याचे पाणी उपलब्ध करतो. तिथे लोकांना पाणी पिण्यासाठी एक पेला पण ठेवलेला असतो. ज्याला हवं तो जातो आणि पाणी पित असतो. पण पाणी पित असताना लोकांना नळ किती चालू करावा? पेला किती भरावा? नळ किती वेळ चालु ठेवावा? या गोष्टींचं लोकांना भान राहत न्हवतं. या मुळे पाणी वाया जात होतच, शिवाय पाणी बिल कंपनीला जास्त भरावं लागत होतं. बर्याच दिवसांनी कंपनी च्या मालकाला ही गोष्ट लक्षात आली. मग त्याने त्या नळाच्या देखरेख करण्यासाठी माणुस ठेवला. तो माणुस प्रत्येक पाणी पिणाऱ्या कडे लक्ष देत होता. आणि काही चुकीचं वर्तन झालं की रागावत होता. काही दिवसानंतर काही अहंकारी लोकांनी तिथे येणं बंद केलं. ते विचार करत होते की " तिथे जाऊन कशाला त्या माणसाचे बोलने खायचे? तो थोड्याशा चुकीला लगेच बोलतो. कशाला आपला इगो खराब करायचा? " पण ही लोक "आम्ही चुकीचं वागु नये.. "असं कधीच म्हणत न्हवती. काही दिवसानंतर मालकाला ही गोष्ट लक्षात आली. अगोदर सारखी लोक पाणी प्यायला नाही येत, आणि उलट तिथे काम करणार्या माणसाला नावं ठेवतात. मालकाला वाईट वाटलं. मग त्याने त्या पाण्याला किंमत ठेवली. १० रुपये लिटर. आणि देखरेख करण्यासाठी ठेवलेल्या माणसाला एक मोजमाप दिलं. आता तो माणुस स्वतःच किंमती नुसार पाणी मोजून देत होता. आता मात्र तिथे गर्दी जमत होती. कारण बोलने न घेता पाणी मिळत होतं. आणि बाहेर २० रुपये लिटर असल्याने लोक इथेच पाणी घेत होते. आता लोक जमत होते, लोकांना पण आनंद होता, कंपनीला इनकम चा फायदा होत होता...!
तात्पर्य :- कुठल्याही गोष्टीला किंमत नसे पर्यंत त्याचं महत्त्व लक्षात नाही येत. म्हणून कुठलीही गोष्ट अपेक्षा न ठेवता केली तरी चालेल पण निव्वळ फुकट करु नये. अल्प असेल तरी चालेल पण किंमत ठेवावी.
Writer :- Abhishek ashtikar ( mobile :- 9075246837)