ब्राह्मण समाज आणि आरक्षण
नमस्कार मित्रांनो,
मी एक ब्राह्मण व्यक्ती आहे म्हणून आपल्यासमोर प्रश्न उपस्थित करत आहोत
आजची परिस्थिती बघता ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज आहे का ? आरक्षण माघीतल पाहिजे का ?
आरक्षण मिळाले किंवा नाही मिळाले तर काय होईल ?
ह्या बाबत मी आज आपल्यासमोर माझे विचार मांडत आहे.
आज ब्राह्मण समाजाची परिस्थिती अशी झाली आहे की
'इकडे विहीर आणि तिकडे आड' अशी आहे का तर काही ब्राह्मण संघटना आहेत ज्या आरक्षण मागत आहेत आणि काही नको म्हणून आंदोलन मोर्चे काढत आहे. ह्यामध्ये ब्राह्मण व्यक्तीचे हाल होत आहे.सामान्य व्यक्ती आपली भूमीका विसरून आपले मत विसरून ब्राह्मण संघटनेच्या माघे फिरत आहेत.ह्यामध्ये फक्त संघटनेला राजकीय,सामाजिक फायदा जो व्हायचा तो तर होतोच पण सामान्य व्यक्तीची फजिती होत असते.
पण सामान्य माणसाने ( सामान्य म्हणजे जो कोणत्याही संघानेत नाही ) आरक्षण माघीतले पाहिजे का तर माघे उत्तर असेल नाही .कारण ब्राह्मण समाजाला सरस्वती प्रसन्न आहे व त्यामुळे तो आपल्या बुद्धीवर आपल्या मनावर विजय मिळवून सर्वात पुढे जाऊ शकतो . मग त्याने आरक्षण माघूच नये. हो आरक्षणाची गरजच नाही तुमच्याकडे बुद्धी आहे त्यावरती विजय मिळवा. हो विद्यार्थी असेल तर त्याने जास्तीत जास्त आभास करून सर्वात पुढे जाऊन विजय मिळवावा. तरुण ब्राह्मण व्यक्ती असेल त्याने सरकारी जागा कधी निघेल, सरकारी नोकरी कधी लागेल,सरकारी नोकरी साठी काय करावे ह्या विषयावर विचार न करता,ह्यांच्या माघे न फिरता सरळ आपला स्वतःच्या व्यवसाय सुरू करावा.
सरकारी नोकऱ्यांमध्ये काहीही राहिलेलं नाही रिकाम्या रांगा लावून वेळ वाया घालवू नये सगळे सरकारी कामे हे खाजगी क्षेत्रात येत आहेत .त्या मुळे येणाऱ्या भविष्यात सगळे सरकारी क्षेत्रातील कामे हे खाजगी कंपन्याना देण्यात येतील .
तसेच जर आरक्षण मिळाले तरी सुद्धा 10 आणि 12 जागा सरकारी नोकरीत असतात त्यासाठी 1000 ब्राह्मण विद्यार्थी राजग लावतात नंबर लावतात व 10 ते 12 विद्यार्थी ला नोकरी लागते बाकीसाजे 988 विद्यार्थी ब्राह्मण तरुण नुसते फिरत राहणार का ? ,आज येथे नंबर लाव उद्या तेथे रागा लाव असच चालू राहणार व बेरोजगारी वाढेल .म्हणून सरकारी नोकऱ्यांची आशा न ठेवता. स्वतःचा व्यवसाय सूरु करावा.अनेक ब्राह्मण व्यावसायिक आहेत की जे खूप चांगला व्यवसाय उद्योग करतात . ते त्यांच्या जागी सफल आहेत.त्यांचे विचार घ्या त्यांचे मत घ्या ,त्यांची मदत घ्या त्यांच्या विचाराने नवीन व्यवसाय सुरू करा मी असे म्हणत नाही की स्वतः विचार करू नका तुम्ही स्वतः विचार करू शकतात पण उद्योग यशस्वी करायचा असेल तर दोन चार लोकांचे विचार घेऊन नवीन व्यवसाय सुरू करावा.
ब्राह्मण व्यक्तीने ब्राह्मण व्यक्तींना मदत करावी जास्तीत जास्त ब्राह्मण व्यक्तींना काम द्यावे ब्राह्मण व्यक्तींना प्रथम प्राधान्य द्यावे.
म्हणून मित्रानो ब्राह्मण समाजाने आरक्षणामध्ये वेळ वाया न घालता.आरक्षणाच्या बळी न पडता. आपला अनमोल वेळ वाया न घालता. फक्त आपण ब्राह्मण आहोत हे लक्षात ठेवून ब्राह्मण व्यक्तीला काम द्यावे.
माझा आपल्यावर विश्वास आहे की आपण नक्कीच माझ्या मतावर विचार करून चांगलं योग्य तो निर्णय घ्याल..धन्यवाद...
शुभम गालफाडे
शुभस्वप्न समूह,औरंगाबाद.