व्यवसाय एक युक्ती

व्यवसाय एक युक्ती


नमस्कार मंडळी शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटले असेल.पण मी आज तुम्हाला आपल्या समाजातील खरी परिस्थिती सांगणार आहे.आज समाजामध्ये जे काही घडत आहे.सगळे म्हणतात आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहोत हे सगळं आपण फक्त आणि फक्त ऐकतोय नाही काही बदल नाही काही परिणाम नाही कोणती कृती.
पण मला एक व्यावसायिक व्हायचे आहे मग मी ह्याकडे लक्ष द्यायला नको का ? तर हो आपण ह्याकडे लक्ष देयला पाहिजे देश खूप वाटचाल करत आहे त्याला आद्योगिक क्षेत्रात प्रगती पाहिजे आज काल खूप कामगार वर्ग निर्माण होत आहे.लोकांना नोकऱ्या मिळणं बंद झालय आपल्या समाजाचे तर खूप वाईट हाल चालू आहे शंभर मधल्या लोकांतून एकाला सरकारी नोकरी मिळते.म्हणून आपल्या समाजातील अडचणी खूप वाढलेल्या आहे ह्यासर्व अडचणींवर एक पर्याय म्हणून,एक तोडगा म्हणून आपण व्यवसाय निवडतो.
आणि तो समृद्ध पणे करणे म्हणजे एक आयुष्यभराची जोखिमच होय


व्यवसाय एक युक्ती म्हणजे काय ? 
आपण मेहमी व्यवसाय कोणता करू काय करी ह्यावर्ती विचार करत असतो आणि आपण बऱ्याच व्यावसायिक यांचे मार्गदर्शन घेतो सर्वाना विचारतो, व्यवसाय कोणता करू? तरीही हा प्रश्न सरासरी सुटतच नाही 
              मग व्यावसाय एक युक्ती हा पर्याय वापरावा
म्हणजे काय तर आज लोकांना कशाची गरज आहे.लोकांना काय आवडते,लोकांची अडचण काय आहे,मार्केट मध्ये कक्षाला वाव आहे,काय विकल्या जाऊ शकते, ह्या सर्व विषयावर विचार करावा 
लोकांना ज्याची गरज आहे ते तुम्ही देत असाल तर तुमच्या उत्पादनाची विक्री होणार.लोकांना अडचण कुठे येत आहे लोकांना कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे त्यावरती विचार करा आणि ती अडचण दूर करा तुमचा व्यवसाय आपोआपच वाढेल एक साधं उदाहरण मी येथे देतो आपल्या सोयायटी मध्ये छोट्याशा टपरित एक माणूस लॉड्री चालवतो तो सगळे कपडे 5 रु पासून इस्त्री करून देतो 
ह्या मध्ये त्याने काय केले म्हणजे लोकांना घरी इस्त्री करायची अडचण होते ती अडचण त्याने दूर केली म्हणून तो आज फक्त 5 रु मध्ये श्रीमंत होतोय.


अश्याच प्रकारे विचार करून लोकांची अडचण दूर केली की आपण सफल झालो समजायचं 


व्यवसाय करायच्या पायऱ्या
व्यवसाय सुरू करताना आपण जास्त मोठा विचार करून चालत नाही आपण जर ससा व्हायला गेलो तर आपण फसू शकतो आपण नेहमी कासवासारखे सगळीकडे लक्ष ठेऊन माघे-पुढे काय चालले आहे बघून चालत राहिले पाहिजे.मार्केट मध्ये आपण नेहमी बरोबर आहोत का .दिवसेंदिवस आपला व्यावसाय वाढत आहे का  काही वृद्धी होत आहे का की आपण लॉस मध्ये चाललो आहे. मार्केट मध्ये आपले उत्पादन किती लोक घेतात आपला उत्पादन ची कॉलिटी दर महिन्याला चेक करावी.ग्राहक खूश आहेत का कुणाला काही अडचण आहे का हे सर्व वारंवार तपासत राहणे खूप महत्वाचे आहे.
त्यासाठी आपण नेहमी विचार करूनच निर्णय घ्यावा.
कोणताही व्यवसाय असो सुरुवात गरिबासारखी करायची म्हणजे लहानातुन मोठे व्हायचे मोठयातून मोठे होत नाही
म्हणून लहानापासून सुरुवात करावी नेहमी लहान घास घ्यावा. हळू हळू वाढणारे वडाचे झाड जास्त दिवस टिकते त्यांचे आयुष्यमान जास्त.


व्यवसायात कायम कसे राहावे?


व्यवसाय कायम राहणे म्हणजे जे काही खाज खळगे  येतात त्यांचा पराभव करून विजय मिळवून पुढे जात राहणे म्हणजे कायम राहणे
आपल्या सोबत पाळणारे खूप लोक असतात आपल्या सारखा व्यवसाय चालू करून आपल्याशी स्पर्धा करायला बघतात आपल्याला हरवायला बघतात कमी किमतीत चांगल्या वस्तू मुद्दामून विकतात आपली  विक्री व्हावी व समोरच्याला व्यवसाय बंद कसा पडेल ह्यावर्ती सर्व भर देतात मग अश्या लोकांशी आपली स्पर्धा असते असेच लोक आपल्याला मुद्दामून त्रास देत असतात आपल्याच सारखे उत्पादन बनऊन मार्केट थंड करतात म्हणून व्यवसाय करण्यासाठी आपले मन तयार असले पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी माघे हटणार नाही 
दहा वेळेस कमी पैसे येतील मी हरेल पण अकराव्या वेळेस जेव्हा मी जिकेल तेव्हा मक पहिल्या क्रमांकावर असल्याशिवाय राहणारं नाही
आपल्याला हर व्यवसायात टिकून राहायचे असेल तर उधारीवर धंदा करू नका एक रुपया सुद्धा उधार देऊ नका कारण जेव्हा तो शंभर रु चे उत्पादन उधार घेऊन जातो तेव्हा त्याच जागेवर तुम्हाला तुमचा पैसा अडकवाव लागतो त्यामुळे कोणालाही उधार देऊ नका कोणताही निर्णय विचार करूनच घ्या.


एकत्र येऊन काम करावं 
आपल्या सर्वानाच एक गोष्ट माहीत आहे की जर आपण एकत्र दहा काड्या घेतल्या सर त्या तुटन नाही आणि एकच घेतली तर लगेच तुटते 
म्हणून टीम वर्क महत्वाचे आहे एकसंघाणे काम करणे खूप महत्वाचे आहे आपण कोणताही व्यवसाय सुरू करत असतो तेव्हा जर आपण व्यवसायात जसे आपण सोबती म्हणतो तसे लोकांना एकत्र करा तुम्ही सफल नक्की व्हाल


चला तर माझा भविष्यातील तरुण उद्योजकांनो करा काम सुरू निवडा व्यवसाय व लागा कमाला करा आज पासून सुरुवात ह्या देशाला गरज आहे व्यवसायाची उद्योजकांची चला तर मग देश घडवूया उद्योजक बनवूया 


शुभम गालफाडे
शुभस्वप्न समूह,औरंगाबाद.
9284328821